Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र

Ashish Shelar 1
Photo Credit: Twitter / @Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर नवे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चिघळत आहेत. भाजप देखील शिंदे यांच्या बाजूने बोलत आहेत.

शिवसेनेने आजच्या सामना या त्यांच्या मुखपत्रातून भाजपचा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करत आरोप केले आहेत. आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगी तुरा रंगला आहे.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मागील काही दिवसांत शिवसेना आणि विशेष करुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर लक्ष केंद्रीत करत टीकांचा भडिमार केला आहे.

शिवसेनेकडून शिंदे गटाकडून चालविल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या दांडिया महोत्सवावर टीका केली गेली होती. त्यावर आता भाजपचे आशिष शेलार यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला दिला आहे.

‘मग घ्या ना धौती योग!’ या शीर्षकाखाली आशिष शेलारांनी एक पत्र ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच त्यांनी शिवसेनेच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून घालण्यात आलेल्या बंदीचा देखील उल्लेख घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात

‘पीएफआय’बाबत किरीट सोमय्यांचा मोठा दावा; म्हणाले, या संघटनांना निधी…

‘शिवभोजनथाळी’बाबत मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळाबाई’ म्हणत भाजपची सामनातून केली पोलखोल

“…तोपर्यंत नरेंद्र मोदी मला संपवू शकत नाहीत”; पंकजा मुंडे यांचे पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य