जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाहीत ना??- आशिष शेलार

मुंबई |  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटला, असं वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट पवारांवरच निशाणा साधला आहे.

माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणतात…इंदिरांजीनी लोकशाहीचा गळा घोटला,असे जितेंद्र आव्हाड म्हणतात.. दोघांची ओळख ही बारामतीकर गुरुंचे पट्टशिष्य! मग.. शिष्यांच्या मुखातून “गुरु” तर बोलत नाही ना?, असं ट्वीट करत त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाही ना? असा संशय व्यक्त केलाय.

आशिष शेलार यांनी शरद पवार आणि इंदिरा गांधी यांच्या संबंधांवर देखील बोट ठेवत पवार आपले जुने हिशेब तर चुकते करत नाहीत ना? असाही सवाल शेलार यांनी केला आहे.

दुसरीकडे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित वक्तव्यावर दिलं आहे. तर इंदिरा गांधींबाबत केलेलं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पाठीमागे घेतलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…..हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे; जामिया गोळीबारावर थोरात यांचं मत

-एका नगरसेवकाने घेतली दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी; कोल्हापूर महापालिकेतला प्रकार

-तुकाराम मुंढेंची धडाक्यात कामाला सुरूवात; दिला 4 कर्मचाऱ्यांना दिला

-नथुराम गोडसेला मानतो हे सांगायची मोदींमध्ये धमक नाही – राहुल गांधी

-कोरोना व्हायरस भारतात दाखल; केरळमध्ये पहिला रूग्ण आढळला