“हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक सातत्यानं हिंदूविरोधी असल्याची टीका करत आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी गुढीपाडवा सणावरून महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्यात हिंदू सणांच्या परवानगीवरून जोरदार राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुढीपाडवा आणि राम नवमी सणांच्या परवानगीचा विषय चर्चेत आहे.

गुढीपाडव्याच्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांबाबत ठाकरे सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली नाही. यावरून शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, अशी टीका शेलार यांनी केली आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

हिंदू नववर्षाच्या निमित्तानं मिरवणुकांसाठी परवानगी देण्याची मागणी मी अधिवेशनात देखील केली होती. पण तेव्हापासून अद्यापी या विषयावर काहीच निर्णय झाला नाही, असं शेलार म्हणाले आहेत.

मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलदरम्यान मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांंनी कलम 144 लागू केल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे.

रामभक्तांचा विषय आला की शिवसेना बोटचेपीपणाची भूमिका का घेते?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. पुर्ण कायदेशीर परवानग्या घेवून निर्णय घेण्यात यावा, असंही शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपकडून आता राम नवमी आणि गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला शिवसेनेला हिंदूत्वाच्या प्रश्नावर घेरण्यात येत आहे. परिणामी शिवसेना-भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं” 

‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य