मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भारतात देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. 2 टप्प्यातल्या लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी केली गेली आहे. मात्र देशातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही नियम शिथील करण्यात आले आहे. शिथील केलेल्या नियमांमध्ये झोननुसार दारूची दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. जरी केंद्र सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने घाई करू नये, असा सल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.
केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे, असा काळजीवजा सल्ला आशिष शेलार यांनी शासनाला दिला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार,पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम!”.
लॉकडाऊनमध्ये काल पहिल्यांदाच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातील तसंच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अनेक शहरांमध्ये दारूच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी तर दुकाने सुरु होणार नाहीत असं सांगून पोलीसांनीच या गर्दीला पिटाळून लावलं.
केंद्राच्या सूचना असल्या तरी, देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्याने परिस्थितीनुसार दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. महसूल वाढणार असला तरी कौटुंबिक हिंसाचार,पोलिसांवर ताणही वाढणार. राज्य शासनाने घाई न केल्यास हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम! pic.twitter.com/lVvIjhQCSJ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
-‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर
-काँग्रेस सरकारने चालू केलेल्या अनेक योजना या संकटाच्या काळात प्रभावी ठरतायेत- अभिजीत बॅनर्जी
-कोरोनाच्या आकडेवारीत मोठा झोल आहे; निलेश राणेंचा आरोग्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
-काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत
-“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”