मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा होत आहेत. हळूहळू त्या चर्चा खऱ्या होताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील नेते नाराज असल्याचं समोर आलं आहे. अशातच भाजप टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा खोचक प्रश्न आशिष शेलारांनी केला आहे.
आशिष शेलारांच्या या खोचक प्रश्नावरुन सध्या वातावरण गरम झालं असून शिवसेना आक्रमक झालेली दिसत आहे.
आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी आशिष शेलारांवर संताप व्यक्त करत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत, लकवा वगैरे शब्द वापरतायत. मला वाटतंय यांच्याच मेंदूला लकवा आलाय की काय, असा टोलाही कायंदे यांनी लगावला.
आशिष शेलार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई लागली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही स्वप्न पडत आहेत, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार
Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर
IPL 2022: देवदत्त पेडिक्कलचा कॅच वादाच्या भोवऱ्यात; अंपायरच्या निर्णयावर SRH नाराज; पाहा व्हिडीओ
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘येत्या 14 एप्रिलला…’
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”