औरंगाबाद महाराष्ट्र

“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”

नांदेड |  व्हॅलेंटाईन दिनाचं औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत अभिनेता रितेश देशमुख नांदेडमध्ये घेत आहे. यावेळी त्याने अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांना अनेक प्रश्न विचारत आयुष्याच्या अनेक हळव्या क्षणांवर तसंच सुख-दुखा:च्या आठवणींवर बोलतं केलं.

समोरच्या व्यक्तीमधील आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते. तो व्यक्ती आपल्या मनात बसतो आणि मग आपण ठरवतो की बस्स… हाच तो व्यक्ती आहे की ज्याच्याशी आपण लग्न करायचं आणि सुखी संसार थाटायचा… असं आपण अशोक चव्हाण यांच्यामध्ये काय पाहिलं??, असा प्रश्न रितेशने अमिता यांना विचारला. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामधला प्रामाणिकपणा (honesty) मला सर्वाधिक भावला अन् मी लग्नाचा निर्णय घेतला, असं अमिता यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांचे वडिल शंकरराव चव्हाण हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला डील करण्यात काही अडचण आली का? किंवा काही दडपण होतं का? या प्रश्नावर निश्चित दपडण होतं. पण प्रेमापुढे काय??? आम्ही दोघांनीही घरच्यांना समजावलं आणि लग्नाचा निर्णय घेतला, असं अमिता यांनी सांगितलं.

अशोकच्या घरात पहिल्यापासूनच प्रेमाचं आणि खेळीमेळीचं वातावरण होतं. मी माझ्या सासुबाईंना कधीच सासुबाई म्हटलं नाही. मी नेहमी आईच म्हणते. त्यांनीही मला खूप सांभाळून घेतलं, असंही सांगायला अमिता विसरल्या नाहीत.

पाहा अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांची रितेशने घेतलेली मुलाखत-

महत्त्वाच्या बातम्या-

-कन्हैया कुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला!

-…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!

-धक्कादायक…. मासिक पाळी नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

-1 एप्रिल ठरवणार ‘ठाकरे सरकारचं भविष्य’; प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी

-सचिनने व्हॅलेंटाईनदिनी जागवली पहिल्या प्रेमाची आठवण!