औरंगाबाद महाराष्ट्र

“शंकररावांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप विलासराव देशमुखांनी केलं होतं”

नांदेड |  आज व्हॅलेंटाईनच्या डे च्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख याने मंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची नांदेडमध्ये प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने अशोक चव्हाण यांच्या आयुष्यातील अनेक घटनांवर आणि क्षणांवर त्यांना प्रश्न विचारले. कॉलेज जीवनापासून ते राजकीय जीवनापर्यंतच्या प्रश्नांना अशोक चव्हाण यांनीही खुमासदार उत्तरं दिली.

विलासराव देशमुख आणि चव्हाण कुटुंबीयांमधलं नातं सांगताना अशोक चव्हाण यांनी उदहारण दिलं ते शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळ बनवतानाच्या खास आठवणीचं…! अशोक चव्हाण म्हणाले-

विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण आणि शिवराज पाटील चाकुरकर हे एकाच कुटुंबातले असल्यासारखे वावरायचे. नानांचा (शंकररराव चव्हाण) आणि विलासरावांचा एवढा स्नेह होता की ज्यावेळी 1986 साली नानांना मंत्रिमंडळ बनवायचं होतं. त्यावेळी नानांनी विलासरावांना सांगितलं की ही मंत्रिमंडळाची यादी घ्या… आणि ज्यांना जे खातं द्यायचंय, ते खातं द्या… फक्त यादी टाईप करून माझ्याकडे पाठवा…!

पुढे बालताना अशोक चव्हाण म्हणाले,  विलासरावांना मी नेहमी माझे थोरले बंधू म्हणून संबोधायचो. ते ही मला भावासारखं वागवत. त्यांच्या आणि माझ्या नात्याबद्दल अधिक काही सांगायची गरज नाही. त्यांचं माझं नातं संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये…

महत्त्वाच्या बातम्या-

-पवारसाहेबांकडे पाहिल्यावर वाटतं… यांच्यासारखं काम करता यायला पाहिजे- अशोक चव्हाण

-“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”

-कन्हैया कुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला!

-…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!

-धक्कादायक…. मासिक पाळी नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!