“पवारसाहेबांकडे पाहिल्यावर वाटतं… यांच्यासारखं काम करता यायला पाहिजे”

नांदेड |  व्हॅलेंटाईन दिनाचं औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची प्रकट मुलाखत अभिनेता रितेश देशमुख नांदेडमध्ये घेत आहे. यावेळी त्याने अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांना अनेक प्रश्न विचारले. तसंच त्यांनीही रितेशच्या कडक प्रश्नाला धडक उत्तर दिली.

रितेशने यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्यावर प्रश्न विचारला. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तसचं त्यांच्या कामाबद्दल आपलं काय मतं आहे, असं रितेशने अशोक चव्हाण यांना विचारलं. त्यावर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. शरद पवार हे तर आजही सक्रिय राजकारणात आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तर अनेक तरूणांना वाटतं की यांच्यासारखं काम आपण केलं पाहिजे किंबहुना हे जसं काम करतात तसं काम आपल्या हातून व्हावं, असे उद्गार अशोक चव्हाण यांनी काढले.

दुसरीकडे शरद पवार आणि माझे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात नेमही भांडण असल्याचं सांगितलं जातं. मात्र पवारसाहेबांचं आणि नानांचं कधीही भांडणं नव्हतं. मतभेद असायचे ते मराठवाड्याला मिळणाऱ्या निधीबद्दल… मराठवाड्याच्या अनुषेशाबद्दल…. त्यावेळेस मराठवाड्याच्या प्रश्नांवर नानांचे आणि पवारसाहेबांचे खटके उडायचे, असंही सांगायला चव्हाण विसरले नाहीत.

शरद पवारांबद्दल आजही आम्हाला नितांत आदर आहे. अजित पवार आणि माझेदेखील उत्तम संबंध आहेत. वाद होतात पण ते लोकांच्या प्रश्नांसाठी… मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी पण वैयक्तिक संबंधात यामुळे कुठेही अडचण येत नाही, असंही चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अशोक चव्हाणांमध्ये ती गोष्ट पाहिली अन् मी लग्नाला होकार दिला”

-कन्हैया कुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला!

-…म्हणून पुण्यात ‘सविता भाभी तू इथंच थांब’ फ्लेक्सबाजी झाली होती!!

-धक्कादायक…. मासिक पाळी नाही हे तपासण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

-1 एप्रिल ठरवणार ‘ठाकरे सरकारचं भविष्य’; प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी