औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रातील (Arabian Sea) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मागील सरकारच्या काळामध्ये काही त्रुटी राहिल्याचं माहिती टीकाही केली जात आहे. तसेच मासेमारी, जैविकता आणि मीठागार हे काही प्रश्न असल्याने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यातच आता शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Shiv Sangram Party chief Vinayak Mete)
यांनी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांना शिवस्मारकबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावरून अशोक चव्हाण यांनी विनायक मेटेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामावरून संबंधितांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यावरून आमदार विनायक मेटे यांनी मुदतवाढ का दिली? यासह अनेक प्रश्न केले.
त्यावरून मंत्री अशोक चव्हाण यांनी मग मेटे नेमकं तुम्हाला काय पाहिजे?असा खोचक प्रश्न केला आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी विनायक मेटे यांनी केलेल्या प्रश्नांनाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी विनायक मेटेेंनी एकाच वेळी 10 ते 12 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे माझ्या स्मरणात राहिले तेवढ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पुर्ण व्हावे, ही जशी तुमची इच्छा तशीच आमची देखील आहे.
स्मारकाच्या उभारणीत आवश्यक असलेल्या परवानग्या घेताना ज्या त्रुटी तुमच्या सरकारच्या काळात त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या आहेत.
या सर्वांच्या याचिकांवर उत्तरे देण्याचे काम सरकार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय उच्च न्यायालयात पाठवला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मासेमारी, समुद्रातील जैविकता, मीठागरांचा समावेश हे विषय असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
तुमच्या काळात जर सगळ्या गोष्टी आणि परवानग्या यांचा अभ्यास केला असता तर आज महाराजांच्या स्मारकाचे काम रखडले नसते.
न्यायालयीन प्रकिया आणि गेल्या दीड दोन वर्षांपासून राज्यात सुरू असलेल्या कोरोना महामारीचा परिणामही कामावर झाला आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत
‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं
‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा