“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”

मुंबई | लॉकडाऊनचा निर्णय घेताना नोटाबंदीसारखा न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेळ द्यायला हवा होता. जर वेळ दिला असता तर देशामध्ये लाखो मजूर-कामगार-विद्यार्थी अकडून पडले नसते, असं मत काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ते लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलत होते.

कोरोनाबाबतच्या उपाययोजना करत असताना केंद्र आणि राज्यांचा समन्वय असणं अतिशय गरजेचं आहे. मात्र केंद्र आणि राज्याचा समन्वय नसल्याने गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असल्याने केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत राज्याला दिली पाहिजे. कोणाचे सरकार आहे, याचा विचार करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यात देशातली सर्वांत जास्त रुग्णसंख्या असताना व उत्पन्न बंद असताना केंद्राने मोठी आर्थिक मदत व पीपीई किट तसंच व्हेंटिलेटर्स ही आणि अशी अनेक वैद्यकीय सामग्री द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन

-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

-कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय

-लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय