काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरातांना हटवा; अशोक चव्हाणांचं सोनियांना पत्र?

मुंबई |  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे आणि ते पत्र लिहिलंय बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदारून दूर करा या मागणीसाठी…! याबाबतचं वृत्त एबीपी न्यूज हिंदीने दिलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जी वाईट अवस्था झाली त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरातच जबाबदार आहेत. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात पक्षाची वाढ झाली नाही, असं त्यांनी पत्रात लिहिल्यांचं एबीपी न्यूजने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सध्या नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी वर्णी लावावी, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींकडे केल्याचं कळतंय.

दरम्यान, या पत्राबाबत अशोक चव्हाण यांची कोणतीही बाजू आणखी समोर आलेली नाही. हे पत्र खरंच चव्हाण यांनी लिहिलं आहे का? आणि जर लिहिलं असेल तर त्यांना खरंच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही जिंकण्या-हारण्यासाठी निवडणुकीत उतरत नाही- अमित शहा

-दिल्ली निवडणुकीत ‘गोली मारो’सारखी वक्तव्य आम्हाला भोवली; अमित शहांची कबुली

-‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर

-शरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र

-खुशखबर…. आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!