आर्थिक मंदीचा फटका; हिरो, मारूती पाठोपाठ अशोक लिलँडनेही घेतला उत्पादन कपातीचा निर्णय

मुंबई | नव्या अर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर (जीडीपीचा) हा 5 टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या साडेसहा वर्षांतील सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेतील सुस्तीच्या स्थितीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हिरो, मारूती पाठोपाठ अशोक लिलँडनेही उत्पादन कपातीचा निर्णय घेतला आहे.

 वाहनांच्या मागणीत खूपच घट झाल्याने हा निर्णय घेतल्याचं हिंदुजा ग्रुपने सांगितलं आहे. आमच्या विविध प्लांटमध्ये सप्टेंबर 2019 पासून वाहनांच्या मागणीत कमालीची घट झाल्याने उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अर्थव्यवस्थेतील सुस्तीच्या स्थितीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे अनेक वाहन उत्पादक आणि सुटेभाग पुरवठादारांनी आपल्या उत्पादनात कपात केली आहे. तर काहींनी प्लांट तात्पुरते बंद ठेवले आहेत.

जोपर्यंत बाजारातून पुरेशी मागणी येत नाही तोपर्यंत हे प्लांट बंद राहणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-