मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका

मुंबई | सध्या चालू असलेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. मतदार राजा आता आपल्या हक्कांचा पुरेपुर वापर करत असल्याचं दिसतंय.

पंजाबची निवडणूक यावेळी काही खास असणार आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्यामुळे त्याचा थेट फायदा आता काँग्रेसला पंजाबमध्ये मिळाल्याचं पहायला मिळतंय.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी राजकीय उलटापालट झाल्याचं दिसलं होतं. त्यामुळे तो काँग्रेससाठी एक धक्काच मानला जातो. अशातच आता काँग्रेसला पंजाबमध्ये एकामागून एक झटका बसतोय.

काँग्रेसचे बडे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. मागील 46 वर्षापासून आश्विनी कुमार काँग्रेसच्या हातात हात घेऊन उभे होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा होती. अनेकादा त्यांच्या वक्तव्यातून हे समोर देखील आलं होतं. अशातच आता आश्विनी कुमार नाराज असल्याचं राजीनाम्यातून सिद्ध झालंय.

काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या आश्विनी कुमार यांनी आज काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यात देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तब्बल 46 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर या आशेने पक्ष सोडत आहे की, स्वातंत्र्य संग्रामाद्वारे संकल्पित लोकशाहीचं वचन पूर्ण करण्यासाठी आपण सक्रिय स्वरुपात पुढं जात राहू, असं त्यांनी पत्रात यावेळी म्हटलं आहे.

वर्तमान परिस्थितीत आणि आपल्या प्रतिष्ठेला अनुसरुन पक्षाच्या परिघाबाहेर राहून राष्ट्रीय मुद्द्यांवर चांगल्या प्रकारे काम करु शकेन, असा निकर्ष काढल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

दरम्यान, ऐन निवडणुकीत आश्विनी कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”