मुंबई | भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Asish Shelar) यांचा एक जुना व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हि़डिओवरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सदर व्हिडिओमध्ये आशिष शेलार यांच्या भाषणाचा काही भाग दाखविण्यात आला आहे. शेलार यावेळी भाषणात मी सुद्धा कुरेशी आहे, असे म्हणताना दिसत आहेत. त्यावरुन सध्या त्यांच्यावर टीकांचा भडीमार केला जात आहे.
कुरेशी जर हाजी अराफत (Haji Arafat) सारखा असेल, कुरेशी प्रामाणिकपणे काम करणारा, कोणालाही न घाबरणारा आणि फक्त देवापुढे नतम्सक होणार असेल, तर आजपासून आशिष शेलार हा सुद्धा कुरेशी आहे, असे शेलार या व्हिडिओ बोलताना दिसत आहेत.
शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, मतासांठी आम्ही धर्म, जात आणि गोत्र बदलण्यासाठी तयार आहोत. शेलारवरुन कुरेशी बनायला देखील तयार आहे.
शेलार यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी देखील ट्विट केला आहे. मला आशिष शेलारांचे हे भाषण आणि त्यांनी स्वत:चे केलेले नामकरण आवडले.
आशिष शेलार आणि त्यांचा पक्ष ज्याप्रमाणे हिंदुत्वाचा पुरस्कार करतो, त्यावरुन त्यांच्यावर आता टीका केली जात आहे. त्यांनी ज्याप्रकारे स्वत:ला कुरेशी म्हंटले आहे, त्यामुळे पक्ष त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वोट के लिए हम जाति, धर्म और गोत्र भी बदलने को तैयार हैं !
शेलार से कुरेशी बनने को भी तैय्यार हैं! pic.twitter.com/IkMkxAvS6i— Office Priyanka Chaturvedi🇮🇳 (@Priyanka_Office) September 12, 2022
महत्वाच्या बातम्या –
“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांवर दादर पोलिसांची मोठी कारवाई
शिवसेना कोणाची खटला: शिंदे गटाची नवीन खेळी, शिवसेना अडचणीत
इलेक्ट्रीक वाहणांसाठी येत्या 1 ऑक्टोंबरपासून नवीन नियम; नितीन गडकरींची मोठी घोषणा
‘या’ शेअरमध्ये एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 2.65 कोटी, वाचा सविस्तर माहिती