“विधानसभेसाठी भाजप-सेनेनं एकत्र यावं”

मुंबई : शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌ीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फॉर्म्युला ठरवण्यासाठी गुरुवारी पहिली बैठक पार पडली. त्यावर रिपाईचे रामदास आठवलेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावं, अशी इच्छा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोबत पाहण्याची मला सवय आहे. गे दोघे एकत्र आले. त्यांना माझ्या पक्षाचा आणि महादेव जानकरांचा पाठिंबा मिळाला. तर आपल्याला महाराष्ट्रात 235 ते 240 जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.

या सगळ्यात काही 5 ते 6 जागा रिपब्लिकन पक्षाच्याही असतील. अनेक वर्षांपासून रिपब्लिकनच्या जागा दिसतन नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेला प्रस्तावच अखेरचा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-