“जनतेला विकासाचा रोडमॅप आणि दिलासा देणारी मुलाखत अपेक्षित होती”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे अनैसर्गिक आघाडी’चा खुलासा करणारी मुलाखत असल्याचा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती, असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही म्हणजे काय?, अरे काय तुझ्या बापाचं राज्य आहे का?, अशा एकेरी शब्दात आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-शेती हवामानावर अवलंबून असल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं- शरद पवार

-आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही; शेलारांच्या वक्तव्यावर आव्हाडांचं टीकास्त्र

-“मी छोट्या आणि मोठ्या भावाच्या कात्रीत सापडलो होतो”

-हिंदुत्वाचं वचन मोडलं जात असेल तर मला असलं हिंदुत्व मला नको- मुख्यमंत्री

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”