एन्काऊंटरचा तपास व्हायलाच पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना एन्काउंटरमध्ये पोलिसांनी ठार मारलं आहे. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे परंतू आता एन्काऊंटवर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एन्काऊंटरचा तपास झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे. ओवैसी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दुसरीकडे चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असं म्हणत हैदराबाद पोलिसांची तुलना ज्येष्ठ सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी चंबळच्या दरोडेखोरांशी केली आहे.

दरम्यान, आरोपी पोलिसांकडील बंदूक हिसकावून पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे. मात्र, यात संशयाला जागा आहे. आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावून घेतली असं घटकाभर गृहित धरलं तरी प्रश्न पडतो की पोलिस एवढे बेसावध आणि निष्काळजी होते का?, असा सवाल निकम यांनी व्यक्त केला. निकमांच्याच पावलावर पाऊल टाकत ओवैसी यांनी एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-