गौतम गंभीर म्हणाला, धोनीने मोठी चूक केली, त्याने ही चूक केली नसती तर…

नवी दिल्ली | धोनीला क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर मानलं जातं. भारताला आयसीसीच्या दोन वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने एक मोठी चूक केल्याचं गंभीरने म्हटलंय. जर त्याने ही चूक केली नसती तर अनेक विक्रम झाले असते, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.

जर धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तर अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करू शकला असता. तसेच त्याला कर्णधारपद दिले गेले नसते तर तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता आणि अनेक विक्रम झाले असते, असं गंभीर म्हणाला आहे.

कदाचित क्रिकेट जगताने एक सुंदर गोष्ट मिस केली. ती म्हणजे धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहिले नाही. जर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आला असता तर क्रिकेटने एक वेगळाच खेळाडू पाहिला असता, असं गंभीरने म्हटलंय.

धोनीच्या नावाची चर्चा ही नेहमी त्याचं नेतृत्व आणि शानदार विकेटकिपिंगसाठी केली जाते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन देखील धोनीने वनडे क्रिकेटमध्ये 50 च्या सरासरीने 10 हजार 773 धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, असल्याचं गंभीर म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती रुग्णालयात

-शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचं निधन

-“माझ्या वडिलांची काळजी घ्या, मी लवकरच पाटण्याला येईन….”

-सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…