मुंबई | केंद्रीय मंंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे सुपुत्र आमदार नितशे राणे (MLA Nitshe Rane) यांना कणकवली येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक होणार असल्याचं बोललं जात होतं.
यावरून नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यावरील कारवाई करून कोकणातील तुमच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे का? त्यावरून नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या स्थानाला जर धक्का लागला तर मला बढती मिळेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्हाला प्रमोशन मिळणार का? असा प्रश्न विचारल्यावर माझी प्रमोशनची मर्यादा पुर्ण होणार झाली आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या घडीला नितेश राणे हे विधीमंडळातील सर्वोत्कृष्ट काम करणारे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात नितेश राणे यांच्यासमोर येऊन बोलण्याची कोणाचाही ताकद नाही, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) जोरदार टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही त्यामुळे तीन पक्षांचे तीन विधानसभा अध्यक्ष निवडावेत.
नितेश राणे कुठे आहेत? हे सांगायला मुर्ख वाटलो काय? असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मला माहिती असले तरी मी सांगणार नाही अनिल देशमुख (Anil Deshmukh) काही दिवस अज्ञातवासात होते, अशी आठवण यावेळी नारायण राणे यांनी सांगितली आहे.
नारायण राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांच्यावरही टीका केली आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला याचा आदित्य ठाकरे यांना राग का यावा? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे.
वाघाची मांजर कधी झाली? त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही, असंही राणे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे तिथून जात असताना वेगळ्या प्राण्याचा आवाज काढला असता वेगळ्या प्राण्याची उपमा लागू होते का? असा खोचक सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”
राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी
“वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”