पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, म्हणाले….

मुंबई| प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. यातच परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळावारी पत्रकार परिषद घेत अनेक गोप्यस्फोट केले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी सर्वांची माफी मागितली.

नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेची नियमित प्रथा मोडली आहे. यावेळी त्यांनी मला पवारांसारखा इंग्रजी येत नाही, असा टोलाही लगावला आहे.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहिलं आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , संजय राऊत ह उपस्थित होते.

तसेच या लेटरबॉम्बमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे विरोधकांना आता परमबीर सिंह प्रिय वाटू लागले आहेत, असंही शिवसेनाच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! कांद्याच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी…

‘या’ अभिनेत्रीनं केली होती कंडोमची पहिली…

मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईलाचं पळवलं अन्…..

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’; म्हणणाऱ्यांवर जयंत…

‘मला किस करशीर का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…