IPL 2021: अर्धशतक पूर्ण झाल्यावर विराटनं ‘या’ खास व्यक्तीला केलं समर्पित, पाहा व्हिडीओ

मुंबई|  भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावरील आपल्या आक्रमकतेमुळे नेहमी चर्चेत असतो. विराटने आजवर आपल्या उत्तम खेळीमुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मैदानावरील विरुची आक्रमकता अनेकांना आवडते. विराट कोहली सध्या आयपीएल 2021 मध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील तिच्या नवऱ्याला प्रोत्साहित करताना दिसत असते.

आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीनं चारही सामने जिंकून अपराजित राहणाऱ्या एकमेव संघाचा मान पटकावला आहे. त्यामुळे आरसीबी 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

काल संध्याकाळी विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार झुंज झाली. या सामन्यात कोहलीचा संघ विजयी झाला आणि विराट कोहलीने 72 धावांची नाबाद खेळी साकारली. त्यावेळी त्यानं आपलं अर्धशतक पूर्ण करून आपल्या मुलीला म्हणजेच ‘वामिका’ला समर्पित केलं. तर, पत्नी अनुष्का शर्माला त्याने फ्लाईंग किस दिल्याचं दिसत आहे. हा क्षण व्हिडीओत कैद केला असून आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

कोहलीने या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केल्यावर आपली मुलगी वामिकाला समर्पित केले. आरसीबी व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिल्यामुळे कोहलीची पत्नी अनुष्का आणि मुलगी त्याच्यासोबत प्रवास करत आहेत.

या व्हिडीओमध्ये कोहली बॅट उंचावताना दिसून येत आहे. त्याचे सहखेळाडू त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. तर अनुष्काकडे पाहत असताना कोहली हसतो आणि फ्लाईंग कीस देतो. त्यानंतर वामिकाला आपल्या कुशीत घेतल्याचं हावभाव करतो. विराट कोहलीच्या या अनोख्या अंदाजानं त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत.

हंगामातील तिसर्‍या टप्प्यासाठी अहमदाबादला रवाना होण्यापूर्वी आरसीबी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणखी एक सामना खेळेल. अहमदाबाद येथे चार सामन्यांनंतर आरसीबी कोलकाता येथे पोहचतील जिथे संघ अखेरचे पाच सामने खेळतील. दुसरीकडे, खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर आता आरसीबी संघ आयपीएल विजेतेपदाचा मुख्य दावेदार बनला आहे. ‘विराटसेना’ जर यंदा आयपीएल विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाली तर संघाचे ते पहिले चॅम्पियनशिप ठरेल.

दरम्यान, अनुष्का आणि विराटने मात्र आपल्या मुलीला या पॅपराजींपासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न केला. तिच्या जन्मानंतरच त्यांनी एक पोस्ट करत तशी विनंती केली होती.

‘कृपया आमच्या नवजात बाळाचे फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्कानं फोटोग्राफर्सला केली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा’, अशी विनंती करणारे पत्र या दाम्पत्यानं पापाराझ्झींना लिहिलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

महत्वाच्या बातम्या – 

डाॅक्टरला ऑक्सिजनसाठी रडताना पाहून ‘या’…

कोरोना काळात ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष,…

जाणून घ्या! कोरोना वॅक्सिन घेणे का गरजेचं आहे?

विहिरीमध्ये तो सापासोबत पोहत होता अन्…, हलक्या…

साखरपुडा झाल्यानंतर ‘हे’ कारण सांगून नवरदेवाचा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy