देश

अटल बिहारी यांच्या निधनामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. राजघाटावर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित सर्वांनीच त्यांचा आदरांजली वाहत शोक व्यक्त केला आहे. 

IMPIMP