भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं. त्यांच्यावर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. एम्समध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सकाळपासून एम्समध्ये नेत्यांची रिघ लागली होती. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. सरकारकडून 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अटल बिहारी वाजपेयींवर राजघाटावर अत्यंस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तत्पूर्वी शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव सकाळी 6 ते 9 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सकाळी 10 ते 1 दरम्यान पार्थिव भाजपा केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी 1 ते दीड वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. संध्याकाळी राजघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.