पुणे | पुण्यात काल शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सभा होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुणे दौरा. त्यामुळे पुण्यनगरीत शिवसेेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष शहराला आणि महाराष्ट्राला पाहायला मिळाला.
पुण्यात शिवसेना आणि शिंदे गट दोनही गटांचे जोरदार शक्ती प्रदर्शन झाले. यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्याच नावे बांधलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते. पण ऐनवेेळी त्यावर टीका झाल्यानंतर त्यांना तो समारंभ रद्द केला. ते काल (दि. 02) पुण्यात अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरीत आले होते.
यावेळी महाविकास आघाडी सरकारचे माजी शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) देखील आले होते. त्यावेळी कात्रज चौकातून जाताना शिवसैनिक आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा आमनेसामने आला. तेव्हा शिवसैनिकांनी गद्दार, गद्दार अशा घोषणा दिल्या.
यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. तसेच यावेळी शिवसैनिकांकडून पाण्याच्या बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटून गाडीतील सहकारी जखमी झाले.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातील कात्रज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच वेळी कार्यक्रम होता. त्यामुळे हा प्रकार घडला.
याप्रकरणी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हल्ला करणारे शिवसैनिक नव्हते, ते दुसरेच कोणी लोक होते. त्यामुळे पोलिसांनी व्हिडीओ पाहून त्यांना तात्काळ अटक करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा भ्याड हल्ला करणारा शिवसैनिक नव्हते. पोलिसांनी व्हिडीओ पाहून संबंधितांना अटक करावी, असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”
अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…
टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार
‘त्या निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये’; शिंदेंची न्यायालयाला विनंती
नाशिकच्या मासिक पाळी प्रकरणाला नवं वळण, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर