नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे एका महिलेने काळा झेंडा दाखवला होता. पंतप्रधान मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या या महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे.
पंतप्रधान मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्या रीता यादव यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात रीता यादव जखमी झाल्या आहेत.
अज्ञातांनी केलेल्या या गोळीबारात रीता यादव यांच्या पायला गोळी लागली. पायाला गोळी लागल्याने रीता यादव चांगल्याच जखमी झाल्या. हल्ला झाल्यानंतर यादव यांना ततातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
रीता यादव यांनी समाजवादी पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. यादव त्यांचं काम संपवून सुलतानपूरमधून घरी परत जात होत्या. यावेळी लंभुआ परिसरात काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
लंभुआ परिसरात हायवेवर तीन जणांनी यादव यांच्या बोलेरो गाडीला ओव्हरटेक करून समोर गाड्या आडव्या उभ्या केल्या. यानंतर त्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला ज्यात यादव यांच्या पायाला गोळी लागली.
यादव यांना गोळी लागताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. या अज्ञात हल्लेखोरांचा तपास पोलीसांकडून घेतला जातला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 नोव्हेंबर रोजी पूर्वांचल एक्सप्रेस-वेचं उद्घाटन करण्यासाठी सुलतानपूर जिल्ह्यातील अरवल कीरीमध्ये गेले होते. यावेळी सभा घेताना रीता यादव यांनी पंतप्रधानांना काळा झेंडा दाखवला होता.
रीता यादव यांनी पंतप्रधानांना काळा झेंडा दाखवल्यावर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेच्या दोन दिवसानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. यानंतर एक महिन्याने रीता यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती एका वृत्तात आहे.
दरम्यान, त्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा खुलासा देखील रीता यादव यांनी त्यांच्यावरील हल्ल्यानंतर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर
मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही
नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!
अनिल परब केंद्राच्या रडावर, लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई
इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न; ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू