‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई | सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नसल्याने ही काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जातंय. तसेच मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर सर्वच मंत्र्यांनी नापसंती व्यक्त करीत, त्यांच्या प्रस्तावित मुदतवाढीला अप्रत्यक्ष विरोध केल्याची माहिती समोर आली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही राजकारण आहे का मुख्यमंत्री महोदय,?, असा प्रश्न भाखतखळकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. तसेच हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो…, असा टोला भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.

दरम्यान, काँग्रेसला सरकारच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-…तर कोरोना चाचणी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

-‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांना टोला

-भारतानं अमेरिकेला साथ दिली तर…; चीनची भारताला धमकी

-सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार?- चंद्रकांत पाटील

-लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे