पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी

मुंबई | वादग्रस्त पत्राचाळ घोटाळा प्रकरण गेले अनेक दिवस गाजत आहेत. याच कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) अटकेत आहेत.

यात गेले दोन महिन तपास, आरोप प्रत्यारोप आणि सत्ताधारी आणि विरोधकांची आगपाखड असे कार्यक्रम सुरु आहेत. त्यात आता भाजपने (BJP) मोठी मागणी केली आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर भाजपकडून या मागणीनंतर पहिली प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी भातखळकरांच्या या मागणीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. यावेळी बावनकुळेंना या सर्वांत भाजपची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला गेला.

तेव्हा त्यांना भातखळकरांची पाठराखण केली आहे. भातखळकर हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. पत्राचाळीत शरद पवारांचा हस्तक्षेप आहे, असे जे काही त्यांनी म्हंटले आहे याचा अर्थ त्यांच्याकडे पुरावे असावेत, असे बावनकुळे म्हणाले.

शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना म्हाडा आणि राऊत यांच्या उपस्थितीत पत्राचाळ संबंधी बैठका झाल्या. त्यानंतर वाधवानला हा प्रकल्प देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) देखील त्यावेळी उपस्थित होते, असे बावनकुळे म्हणाले.

गृहखात्याला पत्र गेले असून, आगामी काळात त्यावर चर्चा आणि चौकशी करण्यात येईल. त्यामुळे भातखळरांच्या मागणीत काही तथ्य असेल, तर पुढे ते समोर येईलच, असे देखील बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणी दाढी…”

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मनसेची शिवसेनेवर मोठी टीका; “शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर जनता…”

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस…

“लग्न केवळ शारीरिक सुखासाठी नसते, तर…”; उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण