Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”

chhagan sharad e1642768309153
Photo Courtesy- Facebook/Chhagan Bhujbal

मुंबई | मागील दोन दिवसांपासून ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटामुळे चांगलाच वाद रंगल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारत आहेत.

अशातच आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आणि काँग्रेसने कोल्हेंच्या भूमिकेचा विरोध केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केल्याचं पहायला मिळत आहे.

शरद पवारांनी कोल्हे यांची पाठराखण करत भाजपवर निशाणा साधला होता. भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले, असं शरद पवार म्हणाले होते.

त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस एक असा पक्ष आहे ज्याला काही ध्येय नाही, विचार नाही किंवा धोरण नाही. शरद पवारांचं केवळ एकच धोरण आहे, ते म्हणजे सत्तेत रहायचं, असं भातखळकर म्हणाले.

ज्या छगन भुजबळांनी एकेकाळी महात्मा गांधींचे पुतळे उखडून टाका आणि त्या ठिकाणी नथुरामाचे उभे करा, असं म्हटलं होतं. त्याच छगन भुजबळांना शरद पवारांनी पक्षात स्थान दिलंय, असंही ते म्हणाले आहेत.

एकीकडे महात्मा गांधीच्या विचारांबद्दल कौतुकानं बोलायचं आणि इथं पक्षाचा खासदार अनावश्यक पद्धतीने नथुरामची भूमिका साकारतोय त्यालाही पाठिंबा द्यायचा हीच पवारांची भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांचा यानिमित्ताने वैचारिक ढोंगीपणा समोर आला असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. महात्मा गांधींबद्दल प्रेम म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”

 नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर