शिवस्मारकाच्या चर्चेला भाजप आमदार म्हणाला ‘भलती चर्चा’; निलंबनाची मागणी

नागपूर : विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवर चर्चा सुरु होती. यावेळी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलं. विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच संतप्त झाले होत.

संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. आमदार अतुल भातखळकर यांना तातडीने निलंबित करावं. तो पर्यत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चेचा रोख आपल्या बाजूने वळवळा, मात्र विरोधक ऐकण्यास तयार नव्हते. सभागृहात जोरदार गोंधळ सुरु होता. याच गोंधळात मुख्यमंत्र्यांनी शिवस्मारकाच्या उंचीबद्दल आपलं स्पष्टीकरण दिलं.