‘शरद पवारांचा खाकस्पर्श’, भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. आजच्या ईडीच्या न्यायालयीन चौकशीत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

संजय राऊतांच्या अटकेनंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दुपारी पत्रकार परिषद घेत भाजप सरकार आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यावर आगपाखड केली.

त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक फोटो ट्विट करत संजय राऊत आणि शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. त्यांनी यात शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

भातखळकर यांच्या ट्विटचे शीर्षक ‘खाकस्पर्श’ आहे. यात त्यांनी तीन फोटो एकत्र जोडून टाकले आहेत. शरद पवार आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh), शरद पवार आणि नवाब मलिक (Nawab Malik) व शरद पवार आणि संजय राऊत (Sanjay Raut), असे तीन फोटो आहेत.

या फोटोंच्या माध्यमातून भातखळकर असे सूचवू इच्छितात की, शरद पवार (Sharad Pawar) यांनी ज्यांना ज्यांना हात लावला ते सर्व नेते गजाआड गेले आहेत. त्यामुळे काकस्पर्शचा त्यांनी अपभ्रंश करत खाकस्पर्श केला आहे.

भातखळकरांनी या फोटोमार्फत एका दगडात चार पक्षी मारले आहेत. भातखळकरांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरु असून शिवसेनेचे राजकीय विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) सध्यस्थितीवर त्यांची गंमत घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्या, मग बघू…’, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान

फक्त पत्राचाळच नाही तर ‘या’ घोटाळ्यातही संजय राऊतांचं नाव, ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

‘संजय राऊतांनंतर आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा नंबर’, रवी राणांच्या दाव्यामुळे खळबळ

‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक

शिवसेनेबाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ