“आम्हाला वाटत होतं की बाळासाहेब ठाकरे राऊतांचे गुरू आहेत, पण…”

मुंबई | संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील 12 खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. त्यावेळी पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केलीय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तसंच राणे बंधुंनीही राऊतांचा खोचक टोले लगावले आहेत.

धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा, असं म्हणत भातखळकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय.

आम्हाला उगीच वाटत होते की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच, असं ट्विट करत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावलाय.

आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. संजय राऊत खुर्ची उचलताना कसलंही आश्चर्य वाटलं नाही. कारण, शिवसेनेची जी अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करुन ठेवली आहे, ती खुर्ची उचलण्यापेक्षा जास्त चांगली नाही, अशी टीका नितेश राणेंनी केलीये.

कधी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना भेटणं, कधी प्रियंका गांधी यांची भेट घेण्यासाठई धावपळ करणं, यापेक्षा संजय राऊत यांनी एकदाच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा. जेणेकरुन यूपीएमध्ये जाण्याचं कष्टही वाचेल, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे.

दरम्यान, राऊत साहेबांनी परंपरा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे संस्कृती विसरले त्यांनी अशा पद्धतीचे ट्विट करणे योग्य आहे, असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी भातखळकर आणि राणेंना दिलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही”