“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर भाजपने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. परंतू दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. आता मुखपत्रातून नव्या जोमाने माननीय पंतप्रधानांचा शेलक्या आणि अपमानास्पद भाषेत उल्लेख करायला सुरू करा, असा टोमणा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना लगावला आहे.

अनेकदा संजय राऊत अग्रलेखांच्या माध्यमातून भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण सोडत असतात. उद्धव ठाकरे यांच्या आमदारीवरून झालेल्या राजकारणावर देखील संजय राऊत यांनी अग्रलेख लिहित भाजपवर शरसंधान साधलं होतं.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिल्यानंतर संजय राऊत यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. राज्यावर जे अस्थिरतेचं संकट निर्माण झालं होतं ते आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने संपुष्टात येईल, अशी मला आशा आहे, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि आणि देशाच्या निवडणूक आयोगाचे मी आभार मानतो, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

-कोरोनातून बरे झालेल्या नर्सचं ढोल ताशा लावून स्वागत; पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर गुन्हा दाखल

-पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

-आज आमची प्रतिज्ञा कोरोनाविरुद्ध लढण्याची, जिंकण्याची आणि महाराष्ट्र धर्म राखण्याची- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे