“देवेंद्र आहेत ते तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो लवकरच तुमचा बाजार उठवणार”

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांवी 125 तासांचं स्टिंग ऑपरेशन असलेले 29 वेगवेगळे पेन ड्राईव्ह सादर केले. फडणवीसांनी केलेल्या या आरोपांनी राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली.

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. देवेंद्र आहेत ते… तळपती तलवार आहेत… भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत…, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केलं जातं आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला.

हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचं आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला.

सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील यात आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर 

गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य 

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही”