“हे पुड्या सोडायचे धंदे सोडून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या”

मुंबई | एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता या प्रकरणाची राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे मंत्री नवाब मलिक यांच्यावर देखील जोरदार टीका केली जात आहे. तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून एनसीबीच्या कारवाईचे समर्थन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून मालिकांवर खोचक टीका केली आहे.

नवाब मलिकांचे गौप्यस्फोटांचे सत्र मागील काही दिवसांपासून सुरुच आहे. यावर मलिकांचे कान टोचत भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहेत की, ’हे पुड्या सोडायचे धंदे बंद करून जावयाला एखादा सभ्य धंदा टाकून द्या. अगदी भंगार आणि पंक्चरचाही चालले…’

भातखळकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून नवाब मलिक यांना लक्ष्य केलं आहे. नवाब मलिकांचा भंगाराचा धंदा आहे, या धंद्याचा संदर्भ देत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी देखील मालिकांवर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, ’जावईबापूंचा तसेच स्टारपुत्राचा बचाव करून हौस फिटली असेल तर मंत्री नबाब मलिक यांनी आता राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सरकारी कार्यालयातील फाईलींवर आता धूळ साचली आहे.’

नवाब मलिक मात्र आता काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. त्यांनी समीर वानखेडे यांच्यासोबतच आता भाजप नेत्यांवर देखील टीका करण्यास सुरुवात केली आहे.

अतुल भातखळकर यांनी काय ट्विट केलंय पाहा-

आणखी एक ट्विट-

ही बातमी वाचली का?-

…तर आर्यन खानला पुन्हा होऊ शकते अटक; मोठी माहिती आली समोर

भाऊ जेलमधून सुटला… बहिणीनं फुल्ल टू पार्टी केली, बघा सुहानाचे ते फोटो

महत्वाच्या बातम्या-

“नेत्यांना आता तोंड लपवून पळावं लागणार”; मोठा गौप्यस्फोट करण्याची घोषणा

“राज्यात शिवसेना- भाजपचं बहुमत होत तरीही पवारांनी सरकार बनवलं, मग हा सत्तेचा दुरूपयोग नाही?”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज पुन्हा वाढ, वाचा आजचा दर

कुत्र्याचा अनोखा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आर्यनच्या सुटकेवेळी चोरट्यांना सुळसुळाट, अबब… ‘या’ गोष्टींची झाली चोरी

“तुम्ही जे केले ते आता तुम्हाला भोगावं लागणार” आर्यनच्या सुटकेनंतर सर्वात मोठी प्रतिक्रिया