Top news देश

औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं

औरंगाबाद | सध्या कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने विविध भागात अडकलेले मजूर पायी चालत आपापल्या गावाकडे निघाले आहेत. अशाच प्रकारे काही मजूर आपल्या गावाकडे चाललेले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. एका मालगाडी ट्रेनने 14 मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद जवळ हा भीषण अपघात घडला आहे.

रात्रीच्या सुमारास मजूर रेल्वे रूळावर आंथरून टाकून झोपले होते, असं समजत आहे. सकाळी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ट्रेनने त्यांना चिरडलं. पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

औरंगाबाद जवळच्या बदनापूर-करमाड दरम्यान हा रेल्वे अपघात झाल्याची प्राथमिक आहे. या अपघातात 14 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादच्या शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील राहणारे असल्याची माहिती मिळत आहे. जालन्यामध्ये एका कंपनीत ते सध्या काम करत होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते आपल्या घरी जाण्यास निघाले असता वाटेत ही घटना घडली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृताना श्रद्धांजली अर्पण केली आहे, तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?

-आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी

-सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

-मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोचले सरकारचे कान

IMPIMP