जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds )शनिवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा सायमंड्स कारमध्ये एकटाच होता, जेव्हा त्याची कार टाऊन्सविलेमध्ये रस्त्यावरून उलटली.

अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.

डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती.

अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं.

अँड्र्यू सायमंड्स 1998 ते 2009 या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भाग होता. यादरम्यान, स्टीव्ह वॉ आणि नंतर रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली कांगारू संघ अजिंक्य मानला जात होता.

सायमंड्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 1462, वनडेमध्ये 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा आहेत.

त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. आक्रमक शैली आणि मैदानावरील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यासाठी तो ओळखला जात होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं

“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो” 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले… 

“केतकीला चांगला चोप देणार, चार पाच छान चापट्या दिल्या ना…”