ऑस्ट्रेलियन डायमंड अन् राजमुद्रा; मोदींच्या शाही फेट्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतला आहे. पैठणीच्या कापडावर खास जरीकाम करून त्यावर ऑस्ट्रेलियन डायमंड लावलेला हा फेटा आहे.

या फेट्यावर सूर्यफूल काढण्यात आलं असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा तयार केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी खास मोदींसाठी हा फेटा बनवला आहे. हा फेटा बनवताना मोदींचा कपड्यांचा सेन्स लक्षात घेण्यात आला असून या फेट्याला ऐतिहासिक टच देण्यात आला आहे.

मोदींचा कपड्यांचा सेन्स लक्षात घेता त्यांच्या कपड्यांवर मॅच होण्यासाठी क्रिम कलर निवडला. ऐतिहासिक टच देण्यासाठी पैठणीचे कापड आणि त्या पद्धतीचे जरीकाम करण्यात आलं.

सोनेरी विथ क्रीम कलर असं कॉम्बिनेशन ठरलं. त्यावर गोल्डप्लेटेड ज्वेलरी लावण्यात आली. या फेट्यावर भारीतील ऑस्ट्रेलियन डायमंड आणि विशिष्ट दर्जा असणारे डायमंड वापरले आहेत.

फेट्यावरील सूर्यफुलावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा बसवली आहे. त्याला मोत्याचं डेकोरेशन करण्यात आलं आहे. सूर्यफूलाची नजर नेहमी वर आणि तेजाकडे असते. फेट्यावर सूर्यफुलाचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदाच डिझायनर फेट्यात एअर व्हेंटिलेशनची व्यवस्था केली. कारण हवा खेळती राहील आणि घालणाऱ्याला घाम येणार नाही, असं मुरुडकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

“भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल पाहिले नाहीत” 

“ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच नेहरूंच्या धोरणाने नरेंद्र मोदींना वाचवलं” 

उद्धव ठाकरेंबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ 

कसा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा?; जाणून घ्या एका क्लिकवर 

“शरद पवार म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, त्यांनी पावसातली सभा गाजवली पण…”