ॲास्ट्रलियन प्रेक्षकांना झाला भारताच्या विजयाचा आनंद; दिल्या ‘या’ घोषणा

नवी दिल्ली | नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. मंगळवारी भारतीय संघाने हा विजय खे.चून आणला आहे.

भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाला या सामन्यात मिळालेला विजय पाहून अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. अशातच आता भारतीय संघाच्या या विजयानंतर एका ऑस्ट्रेलियन प्रेक्षकाचा सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हा.यरल होत आहे.

हा व्हिडिओ स्मिता प्रकाश यांनी त्यांच्या ऑफिशिअल अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत स्मिता प्रकाश यांनी हा कोण आहे? असा सवाल विचारला आहे.

व्हा.यरल होणाऱ्या व्हिडिओमधील या व्यक्तीने ऑस्ट्रेलियाची जर्सी घातली आहे. भारतीय संघाला मिळालेल्या विजयानंतर हा व्यक्ती भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा देताना दिसत आहे. घोषणा देणाऱ्या या व्यक्तीसोबत भारतीय संघाचे चाहते देखील घोषणा देत आहेत.

दरम्यान, भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांचा देखील या विजयानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे. या मालिकेत मिळवलेल्या विजयानंतर रवी शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंचे कौतुक करत आहेत. तसेच ते खेळाडूंना शुभेच्छा देखील देत आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रवी शास्त्री म्हणत आहेत की, संघाला मिळालेल्या या विजयानंतर माझ्या डोळ्यात अ.श्रू आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून जो संघ.र्ष दाखवला तो खरंच अवि.श्वसनीय आहे. तुम्ही एकदासुद्धा हा.र मानली नाहीत. तुम्हाला झालेल्या दु.खापती असोत किंवा 36वर बा.द होणे असो. क.ठीण परिस्थितीत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवणे गरजेचे असते.

या सर्व गोष्टी काही एका रात्रीत घडत नाहीत. याच्या पाठीमागे बऱ्याच वर्षांची मे.हनत असते. या विजयातून तुम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल की जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच तुम्ही एक संघ म्हणून उत्तम कामगिरी करता.

आज भारताबरोबरच संपूर्ण जग तुम्हाला स.लाम ठोकत आहे. या विजयाचा आनंद घ्या. जितकी मजा लु.टता येईल तितकी लु.टण्याचा प्रयत्न करा, असं देखील म्हणताना रवी शास्त्री या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-