TESLA: भारतात फक्त ‘या’ 3 लोकांकडे आहे टेस्लाची भन्नाट कार

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर आता सामान्य लोकांचा कल देखील इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (TESLA) लवकरच भारतात पदार्पण करत आहे.

टेस्ला लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कारचं नाव टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवण्यात आलं आहे. मात्र, काही कारणामुळे टेस्लाला भारतात येण्यास उशिर होत असल्याचं कंपनीने सांगितलं होतं.

भारतात सध्या फक्त तीन लोकांकडेच ही टेस्लाची कार आहे. आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी देखील टेस्लाची कार खरेदी केली आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे एक नाही तर दोन टेस्लाच्या कार आहेत. त्यांच्याकडे S-100D या माॅडलची कार आहे. ही कार फक्त 4.3 सेंकादात 0 ते 100 चा स्पिड पकडू शकते. त्यांच्याकडे X-100D माॅडलची देखील कार आहे.

अंबानी यांच्यासह अभिेनेता रितेश देशमुख याच्याकडे देखील टेस्लाची कार आहे. रितेशने पत्नी जेनेलियाला ही कार गिफ्ट म्हणून दिली होती. टेस्ला माॅडल X ही ती कार आहे.

रितेश देशमुखसह माजी मिस इंडिया पॅसिफिक पूजा बत्रा हिच्याकडे देखील टेस्लाची कार आहे. टेस्ला माॅडल 3 ची कार फक्त 5 सेकंदात 100 किमीची स्पीड पकडू शकते.

दरम्यान, टेस्ला कंपनीचे मालक इलाॅन मास्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मास्क यांनी भारतात टेस्ला इंडिया मोटर्स ही उपकंपनी स्थापन केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार

  ‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल

  “कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”