महाराष्ट्र Top news मुंबई

इस्लामपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे रुग्ण मोदींवर टीका केल्याची शिक्षा- अवधूत वाघ

avdhut vagh jayant patil

मुंबई | राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. इस्लामपुरात आढळलेले कोरोनाचे पेशंट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याची शिक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदींनी तडकाफडकी जाहीर केलेल्या लॉकडाऊनवर टीका केली होती. त्यांच्या याच ट्विटला रिट्विट करत अवधूत वाघ यांनी ही टीका केली आहे.

इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटच, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा ही भोगावीच लागेल ना मंत्रीजी, असं अवधूत वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. इथं एकाच कुटुंबाशी संबंधित २५ कोरोनाचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Image

महत्वाच्या बातम्या –

-दिल्लीत एका धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

-भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

-“स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले”

-मुंबई पालिका आयुक्तांचा ‘तो’ निर्णय मंत्री नवाब मलिकांनी मागं घ्यायला लावला

-मुकेश अंबानींकडून तब्बल इतक्या कोटींची मदत; महाराष्ट्रासह आणखी या राज्यालाही केली मदत