उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ शकतात गंभीर आजार
मुंबई | हिवाळा ऋतू संपला असून आता उन्हाळा ऋतूला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेला उन्हाच्या झळाया बसू लागल्या आहेत.
अशा गर्मीच्या दिवसांमध्ये आपल्याला काहीना काही थंड पदार्थ खावेसे वाटतं असतात. आईस्क्रिम, बर्फाचा गोळा, कोल्ड्रिंक्स, असे पदार्थ आपल्या खूप आवडात. तसेच या दिवसांत आपल्याला वारंवार तहान लागते आणि आपल्या घशालाही जास्त प्रमाणात कोरड पडतं असते.
तसेपाहिले तर या दिवसांत आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज असते. काही लोकांना कामांनिमित्त बाहेर जावे लागते. त्यामुळे नियमित जेवण करणे आणि विशेष म्हणजे योग्य तोच आहार घेणे हे जास्त महत्वाचं आहे.
पंरतू उन्हाळ्यामध्ये आपण काही पदार्थ जरी आपल्या ते खूप आवडतं असतील, तरी ते आपण खाणं टाळले पाहिजेत. नाहीतर या पदार्थांच्या अधिक सेवनामुळे तुम्हाला गंभीर आजारांचाही सामना करवा लागण्याची शक्यता असते. तर आज आम्ही तुम्हाला याच पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला थंडगार पाणी प्यावसं वाटतं. परंतू अतिशय उष्ण वातावरणात थंड पाणी पिणे टाळले पाहिजे. थंड पाणी प्यायल्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
- तुम्हाला तुमचे शरिर या उष्ण दिवसांमध्ये थंड ठेवायचे असेल, तर तुम्हाला चहा, कॉफी अशाप्रकारची प्येय पिने बंद केलं पाहिजे. याव्यतिरीक्त तुम्ही लिंबू पाणी, ताक या प्येयांचे सेवन करू शकता.
- अनेकांना या दिवसांत आंबे खाण्यास फार आवडतात. आंबा हा शरिरास फायदेशीर असतो. मात्र त्याचे जास्त प्रमाणात सेवन केलेतर आंब्यामुळे आपल्या शरिरातील उष्णता वाढते. तसेच आपल्या पचनशक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
- या दिवसांमध्ये तेळकट, तूपट पदार्थ खाणं टाळले पाहिजे. नाहीतर आपल्या चेहराही या दिवसांमध्ये तेलकट दिसू लागतो.
- त्याचप्रमाणे मसालेदार पदार्थांचेही सेवन करणं आपण टाळलं पाहिजे. या पदार्थांमुळे आपल्या शरिरातील उष्णता वाढते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येण्यास सुरूवात होते. तसेच आपल्या पाचन क्रियेवरही याचा परिणाम होतो.
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’…
राशीभविष्य: आज ‘या’ राशींच्या लोकांसाठी आहे…
जाणून घ्या! गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’…
फँड्रीतील शालूच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…
रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करिनाच्या दुसऱ्या मुलाचा…