“भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका”

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील हिंसाचारावरून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी एक वक्तव्य केलंय. भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका आहे, असं खामेनी म्हणाले. खामेनी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.

भारतात मुस्लिमांचा नरसंहार झाला आहे. या घटनेने जगभरातील मुस्लिम नाराज आहेत. भारत सरकारने कट्टर हिंदू आणि संघटनांना रोखलं पाहिजे, असं खामेनी यांनी म्हटलं आहे.

इस्लामिक देशांची नाराजी ओढावून घेण्याऐवजी भारत सरकारने मुस्लिमांचा नरसंहार रोखायला हवा, असं ट्विट खामेनी यांनी केलंय. या ट्विटसोबत त्यांनी #IndianMuslimslnDanger हा हॅशटॅगही वापरला आहे.

तुर्कीचे पंतप्रधान अर्दोगान यांनीही पाकिस्तान दौऱ्यावर असताना भारतीय मुस्लिमांच्या मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. भारताने त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत तुर्कीचा अजेंडा असल्याचं म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून आम्ही बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली; संजय राऊतांचा खुलासा

-निर्भयाच्या आरोपींना भरचौकात फाशी देण्यात यावी- अमृता फडणवीस

-“आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”

-“कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला”

-ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर काळाच्या पडद्याआड