अयोध्या प्रकरणी जमियत उलेमा ए हिंदकडून फेरविचार याचिका दाखल

नवी दिल्ली  | अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अखेर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. जमियत उलेमा ए हिंदने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

देशातील बहुसंख्य मुस्लिमांना अयोध्या  खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा लागणे अपेक्षित नव्हते. आम्हाला हा निर्णय मान्य नाही, असं जमियतचे प्रमुख मौलाना अर्शद मसानी यांनी याचिका दाखल करताना सांगितले.

जमियत उलेमा ए हिंदने मशिदीसाठी न्यायालयाने दिलेली पाच एकर जमिन स्विकारण्यासही विरोध असल्याचे अगोदरच स्पष्ट केलं आहे. तर जमियत प्रमाणेच ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाने देखिल न्यायालयाच्या निर्णयावर याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यघटनेने आम्हाला फेरविचार याचिका दाखल  करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, देशातील 99% टक्के मुस्लिमांना या निकालाच्या विरोधात याचिका दाखल करावी असे वाटत आहे, असं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जफरयाब गिलानी यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-