देश

चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा!

नवी दिल्ली |  समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्याने गुरूवारी लोकसभेत चांगलाचा गोंधळ उडाला. लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांच्यावरील केलेल्या वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी माफी मागितली आहे.

अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असेल असं त्यांना वाटत असेल तर मी त्याबाबत क्षमा मागतो, असं आझम खान यांनी म्हटलं.

तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणार नाही, अशी कमेंट आझम खान यांनी लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांच्यावर केली होती. त्यावर संसदेत एकच गोंधळ उडाला होता. 

या वक्तव्यानंतर आझम खान यांच्यावर चहूबाजूने टीकेची झोड उठली होती. संसदेतल्या सर्वपक्षीय महिला खासदारांनी आक्रमक होत रौद्ररूप धारण केलं होतं.

संसदेत आझम खान यांच्या वक्तव्यावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेतला. आझम खान यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी अनेक खासदारांनी केली होती.

दरम्यान, रमादेवी यांनीही या वक्तव्याप्रकरणी अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. कृपया तुम्ही स्वत:चे शब्द मागे घ्या, असं म्हटलं होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-मनसेची ‘ही’ भूमिका आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-रोहित-विराटच्या वादाला नवं वळण; विराट पत्रकार परिषद घेणार!

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

-“…तर अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता”

-काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

IMPIMP