मोदी आणि शहा खुनी आहेत…. तसे माझ्याकडे पुरावे- न्या. कोळसे पाटील

बीड |  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा खूनी आहेत, असा खळबळजनक आरोप न्या. बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. तसंच ते खूनी असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असंही कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये आज संविधान बचाव कार्यक्रम कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, न्या. कोळसे पाटील तसंच सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात न्या. कोळसे पाटील यांनी घणाघाती भाषण करत मोदी आणि शहांवर जोरदार तोफ डागली.

अमित शहा तडीपार गुंड आहेत. मोदी आणि शहा यांच्यावर मास मर्डरचा गुन्हा आहे. याबाबत न्या. सावंत यांनी अहवालही दिला आहे. देशातील सर्व बॉम्बस्फोटांमध्ये आरएसएसचा हात आहे. सध्या आमचं सरकार असल्याने मी याचे पुरावे शरद पवार यांच्याकडे सोपवले आहेत, असंही कोळसे पाटील म्हणाले.

आरएसएस जर धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांनी आरएसएसचा सरसंघचालक दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला करावं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

“दिल्लीकरांसाठी मी जीवन त्यागलं अन् भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं फार दु:ख वाटतंय”