अहमदनगर | राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते बी. जे. खताळ यांचं आज(सोमवार) पहाटे 2 च्या सुमारास संगमनेरच्या रंगारगल्लीतल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 101 वर्षांचे होते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणू उल्लेख केला जायचा. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत योगा, प्राणायम, यासारख्या गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलं.
राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1958 च्या सुमारास त्यांनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून सहकार क्षेत्रात कामाला सुरूवात केली. 1962 ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार झाले.
1943 ते 1962 या काळात नामवंत वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या संगमनेरमधून त्यांनी 1952 पहिल्यांदा निवडणुक लढवली.
खताळ यांच्यापार्थिवावर आज दुपारी चार वाजता प्रवरा नदी तीरावरच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या-
मला कोणी थांब म्हटलं असतं तर थांबलो असतो, पण…- उदयनराजे भोसले- https://t.co/dtwzUJdAU3 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 16, 2019
महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते; पवारांची तोफ धडाडली https://t.co/Do0Zn65VZQ @PawarSpeaks @NCPspeaks @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019
अखेर भाजपमध्ये प्रवेश करताच उदयनराजेंना ईव्हीएमवरचं उत्तर मिळालं! https://t.co/ZnWuwfa8zv @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @NCPspeaks @dhananjay_munde @INCMaharashtra @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 15, 2019