सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो.
तसेच गेल्या काही महिन्यापासून कोरोना रोगाने आपलं डोकं पुन्हा वर काढलं आहे.
त्याचप्रमाणे सगळीकडे सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असल्याचं दिसत आहे. या काळात काही रूग्णांना उपचारही मिळत नाहीयत.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने मास्क लावणे हे बंधनकारक केलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल मीडियावर सध्या अनेक उपाय सांगितले जातात. तसेच आजकार बाजारामध्ये विविध प्रकारचे मास्कही विकायला आले आहेत.
अशातच एका बाबांनी अनोख्या प्रकारचा मास्क बनवला आहे. त्यांनी दोरीचं मास्क बनवलं आहे, त्यामध्ये त्यांनी कडुलिंबाचा पाला आणि तुळशीचा पाला लावलेला आहे. त्या बाबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तो मास्क त्यांनी कसा आणि त्यामध्ये काय-काय आहे याची माहिती सांगितली आहे.
एक मुलगा त्यांना विचारतो की बाब तुम्ही हे मास्क कसं बनवलं? त्यावर बाब सांगतात की लिंबाची पानं असतात ती आजारपणामध्ये खूप उपयुक्त असतात. तुळसही औषधी असल्याचं ते सांगत आहेत.
त्यामुळे लिंबाची पानं आणि तुळशीची पानं नाकावर लावलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी आपलं वय 72 वर्षे असल्याचंही सांगितलं आहे,
तसेच हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘Not sure this MASK WILL HELP’ असं कॅप्शनही दिलं आहे.
त्याचप्रमाणे हा व्हिडीओ आतापर्यंत एक हजार लोकांनी पाहिला असून, अनेकांनी हा व्हिडीओपाहून खूप मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
Not sure this #MASK WILL HELP.
जुगाड़☺️☺️
Still #मजबूरी_का_नाम_महात्मा_गांधी#NECESSITY_is_the_mother_of_JUGAAD #Mask And Medicine😂🤣😷😷😷 pic.twitter.com/uHcHPIBy9D— Rupin Sharma IPS (@rupin1992) May 22, 2021
महत्वाच्या बातम्या-
‘जीने मेरा दिल लुटया…’; चिमुकल्याचा…
चक्क कुत्राही करतोय विकेंडची तयारी, पाहा व्हिडीओ
आता हेच पाहायचं राहिलं होत; चक्क गाई खेळतीय फुटबॉल, पाहा…