बाबा रामदेव यांना ‘कोरोनील’ पडलं महागात; हायकोर्टानं सुनावला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा दंड!

नवी दिल्ली | बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्ययोग मंदिर ट्रस्टने मध्यंतरी ‘कोरोनील’ कोरोनावर प्रभावी असण्याचा दावा केला होता. पतंजली आयुर्वेदच्या याच दाव्यामुळे मद्रास हायकोर्टानं पतंजलीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, मद्रास हायकोर्टानं कोरोनील औषधाच ट्रेडमार्क वापरण्यास मनाई केली होती.

महामारीनं घाबरलेल्या लोकांचा फायदा घेत कोरोनावरील उपचाराच्या नावाखाली सर्दी, खोकला, ताप यासाठी इम्युनिटी बुस्टरची विक्री करून पतंजली आयुर्वेद पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होतं, असं सांगत हायकोर्टाने हा दंड ठोठावला आहे.

पतंजलीकडून येणाऱ्या दंडाची रक्कम प्रतीवादीने त्या संस्थाना द्यावी ज्या संस्था या आपत्तीच्या काळात निस्वार्थपणे काम करत आहेत, असंही कोर्टाच्या आदेशात म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, बाबा रामदेव यांनी दावा केला होता की पतंजली आयुर्वेद कोरोनीलची मागणी पूर्ण करण्यासाठी झटत आहे. दररोज 10 लाख कोरोनीलची मागणी आहे, परंतु आम्ही फक्त 1 लाख कोरोनीलचा पुरवठा करण्यास सक्षम आहोत.

महत्वाच्या बातम्या-

‘या सरकारचं डोकं सरकलंय की काय?’; निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

पहिल्या नवऱ्याला एक कोटी तर दुसऱ्याला 45 लाखाचा गंडा घातला अन् परदेशात तिसऱ्या सोबतच तिचा संसार थाटला

अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!

तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!