औरंगाबाद | सरकारने विरोधी पक्षाला विश्वास घेतलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने हाहा:कार माजला, अशी टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 342 कोटी रुपये दिले. पण राज्य सरकारने फक्त 23 कोटी रुपये खर्च केले. मास्कसुद्धा हे सरकार केंद्राकडून मागतं. आता तरी सरकारने शहाणं व्हावं, असा घणाघात बबनराव लोणीकर यांनी केला.
हे संकट थांबवायचं असेल तर सरकारमधील तीनही पक्षांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. या युद्धात सरकारने सर्वांना सोबत घेऊन काम करणं अपेक्षित आहे, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना युद्धादरम्यान विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला सहकार्य आणि समर्थन राहील, असंही बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले- राज ठाकरे
-‘…हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट असेल’; आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
-“बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांना विश्वासात घेऊनच काम होतंय”
-राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखून बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस
-‘हवा तेज चल रही है उद्धवराव… खुर्सी संभालो’; ‘या’ भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला