‘धोका देणाराच मोठा नेता होतो’, बच्चू कडूंचा आक्रोश उफाळला

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन महिना झाला, तरी त्यांच्या सरकारचा विस्तार काही झाला नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा दिल्ली दौरे केले होते.

अखेर त्यांना काल ऑगस्ट क्रांती दिनाचा मुहूर्त मिळाला. यावेळी शिंदे यांच्या गोटातील नऊ आणि भाजपचे नऊ असे अठरा मंत्री शपथबद्ध झाले. परंतु शिवसेनेतील बंडात बरोबर असलेल्या अपक्ष आणि महिलांना त्यांनी मंत्रिपदे दिली नाही.

यावेळी शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दहा अपक्षांपैकी एकालाही मंत्रिपद देण्यात आले नाही, त्यामुळे नव्या मंंत्रिमंडळात अपक्षांच्या तोंडाला पाने पुसली, असेच म्हणावे लागेल.

यावर आता अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे धोका देणाऱ्यांचे राज्य आहे. धोका देणाराच मोठा नेता होतो, त्यालाच मंत्रिपद मिळते, असे उपहासात्मक भाष्य कडू यांनी केले आहे.

जे लोक सर्वात अगोदर बंडात उतरले, जे लोक सर्वात आधी शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले, ते राहीले मागेे. आणि मागून जे आले, ते आता पुढे गेले आहेत. त्यांना अगोदर मंत्रिपदे मिळाली आहेत, असे देखील कडू म्हणाले.

तसेच या सरकारमध्ये महिला मंत्री देखील नसल्याने अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आमदारांवर अन्याय झाला, असे म्हंटले आहे.

अपक्षांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केले आहे. हा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार असून अद्याप पूर्ण विस्तार व्हायचा आहे. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज नाही. पुढील विस्तारात अपक्षांचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

‘पाळणा हलला पण दोऱ्या कोणाकडे?’, शिवसेेनेकडून नवीन मंत्रिमंडळाचा समाचार

शरद पवारांचे भाजपवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

‘… त्याचेच परिणाम शिवसेनेला भोगावे लागतायत’, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपही झाले, वाचा कोणाकडे कोणतं खातं?

शिंदेंच्या निर्णयावर अपक्षांची नाराजी?, मंत्रिमंडळ विस्तारानंतर म्हणाले…